बियाणांचा काळा बाजार करणाऱ्या दुकानावर धाड (रितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला). मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,अकोला श्री. शंकर किरवे व मा .श्री मिलिंद जंजाळ कृषी विकास अधिकारी,जिल्हा परिषद. अकोला यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 28/5/ 2024 रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार मेसर्स अश्विनी ऍग्रो एजेन्सी ,अडसूळ ता . तेल्हारा जि .अकोला प्रोप्रा यटर श्री. रामराव रामचंद्र पोहरे या बियाणे विक्री केंद्रा तून मेसर्स अजित सीड्स उत्पादित अजित- 155 बीजी 2 या कापूस बियाण्या ची जादा दराने विक्री होत असल्याबाबत गुप्त खबर तालुका व जिल्हा भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार आज दुपारी. 12 वाजेच्या सुमारास मोहीम अधिकारी श्री महेंद्रकुमार. सालखे ,अकोला , श्री सतिश कुमार दांडगे ,जिल्हागुणवत्ता नियंत्रण निरीक्षक , अकोला , तालुका कृषि अधिकारी श्री गौरव राऊत कृषी अधिकारी पंचायत समिती , तेल्हारा ,श्री भरतसिंग चव्हाण ,विस्तार अधिकारी ,तेल्हारा श्रीकोमल भास्कर ,कृषिसहायक, श्री प्रदीप तिवाले यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सदर बियाणे विक्री केंद्रावर छापा टाकून अजित सीड्स उत्पादित संकरित कापूस बियाणे वाण अजित -155 बीजी 2 ची प्रति पाकीट 1400/- रुपये याप्रमाणे जादा दराने विक्री होत असल्याचे रंगेहात पकडले. त्यामुळे कृषी अधिकारी पंचायत समिती , तेल्हारा ,श्री भरतसिंग चव्हाण यांनी मे.अश्वनी ऍग्रो एजेन्सी ,अडसूळ ता तेल्हारा जि .अकोला प्रोप्रायटर श्री. रामराव रामचंद्र पोहरेयांच्या विरोधात बियाणे कायदा 1966,बियाणे नियंत्रण आदेश 1983, कापुस बियाणे किंमत नियंत्रण आदेश -2015महाराष्ट्र कापुस बियाणे कायदा -2009महाराष्ट्र कापुस बियाणे नियम -2010 इत्यादी अन्वये तेल्हारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post Next Post