मेहकरात २० वर्षीय तरुणाचा खून! वसीम शेख मेहकर शहर प्रतिनिधी मेहकर : शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांच्या वादातून एका २० वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. आकाश राजेश नन्नवरे (२०, रा. माळीपेठ, मेहकर) असे मृतक तरुणाचे नाव आहे. काल, २७ मार्चच्या रात्री १० च्या सुमारास मेहकर जानेफळ रोडवरील हॉटेल "पाटलाचा वाडा" समोरील निर्जन भागात ही घटना घडली.घटना घडला.प्राप्त माहितीनुसार आकाश नन्नवरे याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली. पैशांच्या किंवा सावकारी प्रकरणातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. काल रात्री आकाश आणि त्याच्या सहकाऱ्यांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. गंभीर जखमी अवस्थेत आकाशला रात्रीच अकोला येथे उपचाराकरिता हलविण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तूर्तास या घटनेबद्दल अधिक बोलण्यास मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. शिंगटे यांनी नकार दिला, आधी गुन्हा तर दाखल करू द्या असे शिंगटे म्हणाले..

Previous Post Next Post