*सकल मुस्लिम समाजा तर्फे विशालगड हल्ल्याचा तीव्र निषेध व दोषी दंगल खोरांवर कठोर कारवाई ची मागणी... (* मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी)मुक्ताईनगर येथील सकल मुस्लिम समाज व मुस्लिम मंच तर्फे कोल्हापूर येथील विशालगडावर हल्ल्या करणारे व मस्जिद , दर्गा व अल्पसंख्यांक समाजाचे घराचे नुकसान करणारे दंगल खोरांवर कठोर कारवाई मागणी चे निवेदन मा.तहसीलदार यांचे मार्फत मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.सदर घटना 14 जुलै रोजी घडली विशाल गडावर झालेल्या हिंसक वातावरणामुळे अल्पसंख्यांक समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्यांना महाराष्ट्र शासनाने ताबडतोब नुकसान भारपाई द्यावी व तोडफोड करणारे दंगल खोरांना शोधून कडक व कठोर कारवाई करा अशी एक मुखी मागणी आम्ही मुस्लिम मंच मुक्ताईनगर व सकल मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली.ह्या वेळी विविध पक्षाचे राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.सदर निवेदन देतांना मा.हकीम आर चौधरी(जिल्हा उपाध्यक्ष मुस्लिम मणियार बिरादरी) अफसर खान(शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) शकील सर(महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शरद पवार गट)शकील मेम्बर,अहमद ठेकेदार, राष्ट्रवादी कार्यकर्ते रउफ खान,मुख्तार खान,आसीफ भाई पानी वाले,मुश्ताक मनियार, जाकीर शब्बीर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,इरफान बागवान मुस्लिम मोर्चा आदि समाज बांधव उपस्थित होते....फोटो कॅप्शन:-मा.पोलीस निरीक्षक व मा.तहसिल साहेब यांना निवेदन देताना.मा.हकीम आर चौधरी(जिल्हा उपाध्यक्ष मुस्लिम मणियार बिरादरी) अफसर खान(शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) शकील सर(महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष शरद पवार गट)शकील मेम्बर,अहमद ठेकेदार, राष्ट्रवादी noकार्यकर्ते रउफ खान,मुख्तार खान,आसीफ भाई पानी वाले,जाकीर शब्बीर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा,इरफान बागवान मुस्लिम मोर्चा आदि समाज बांधव उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0