लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त परळी नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. प्रशांत जगतकर (परळी बीड जिल्हा प्रतिनिधी:) -- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम देण्यात यावी अशी मागणी परळी नगरपालिकेतील राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर यांनी नगरपालिकेकडे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की परळी नगरपालिकेने नगरपरिषद कर्मचाऱ्यांना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महागाई भत्त्याच्या फरकाची रक्कम देण्यात यावी. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये सन अग्रीम देण्यात यावा व परळी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्ले योजना राबविण्यात यावी या व विविध मागण्याचे लेखी निवेदन दिनांक 17 सात 2018 रोजी परळी मुख्याधिकारी यांना दिले असून याचे लेखी निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई मुख्य सचिव सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय बीड प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र. इत्यादींनाही पाठवण्यात आले असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकार राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ नगरपरिषद परळी शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर यांनी दिली असून या निवेदनावर परळी नगरपरिषद राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे शाखाध्यक्ष प्रशांत जगतकर व शाखा महासचिव विशाल बनसोडे यांच्या सह्या आहेत
byMEDIA POLICE TIME
-
0