*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रावेर तालुका कार्याध्यक्ष पदी विजय अवसरमल* ऐनपुर प्रतिनिधी दि.१२ जुलै रोजी पाल येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जळगाव जिल्हा आयोजित कार्यक्रमामध्ये संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांच्या आदेशाने जळगाव(ग्रा) जिल्हाध्यक्ष संतोष नवले यांनी विजय शामराव अवसरमल यांची सर्वानुमते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रावेर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की, दि.१२जुलै रोजी पाल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई शाखा जळगाव आयोजित शालेय विद्यार्थ्यास शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात जळगाव जिल्हा संघटनेची बैठक घेण्यात आली,त्यात विजय शामराव अवसरमल यांचे संघटनेसाठी मागील कार्य बघता तसेच त्यांनी रावेर तालुका संघटक पदी असताना पार पाडलेली जबाबदारी बघून संघटनेच्या वरिष्ठांकडून त्यांच्या कार्याची दखल घेलती गेली आणि विजय शामराव अवसरमल यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या रावेर तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.याच दरम्यान रावेर तालुका अध्यक्ष पदी रवींद्र महाजन,उपाध्यक्ष पदी सुमित पाटील तर जळगाव जिल्हा (ग्रा ) सचिव पदी इक्बाल पिंजारी तसेच राजेश चौधरी(राज सर)यांची सावदा शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्याप्रसंगी राज्याचे कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे,जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष नवले,जिल्हा कार्याध्यक्ष योगेश सैतवाल,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार,प्रभाकर महाजन,मनीष चव्हाण,गणेश भोई, मगन पवार,सरदार पिंजारी,प्रदीप कुलकर्णी,कैलास लवंगडे,आनंद भालेराव,संजय मानकरे,विजय के अवसरमल,योगेश पाटील,तसेच परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.उपस्थित सर्व पत्रकार बांधवांकडून निवडी बाबत शुभेच्छा देण्यात आल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0