प्रिन्स इंग्लिश स्कूल,सेलू येथे राज्यस्तरीय वुशु स्पर्धेचे आयोजन. ( शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी) परभणी. सेलू :श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल व ऑल महाराष्ट्र वूशु असोसि एशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय 21वी सब ज्युनिअर व 22 ज्युनिअर /युथ मुले मुली वूशू स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धे मध्ये महाराष्ट्र राज्या तील सर्व जिल्ह्यां मधील सुमारे 900 विद्यार्थी सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता जिंतुर-सेलू विधान सभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. मेघनादीदी साकोरे- बोर्डीकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख उपस्थिती एस. एस झंडे, माजी IAS अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वूशू असोसिएशन,एस. एस. कटके महासचिव महाराष्ट्र राज्य वूशू असोसिएशन,गणेश कुटे, सचिव परभणी जिल्हा वुशू असोसि एशन हे उपस्थित राहणार आहेत. या क्रीडा स्पर्धेसाठी सेलू शहरातील तसेच परिसरातील विद्यार्थी व पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष, वूशू असोसि एशन परभणी जिल्हा डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0