त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त 150 वर्षांपूर्वीचे श्री अष्टसिद्धी हनुमान मंदिरामध्ये दीपोत्सव,साचा पीर स्ट्रीट कॅम्प. ( पुणे जिल्हा प्रतिनिधी)येथील दीडशे वर्षांपूर्वीचे श्री वैष्णव बनिया मंदिर संस्थानचे श्री अष्टसिद्धी हनुमान मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते मंदिराभोवती सायंकाळी रोषणाई करत हजारो दिव्यांनी सजवण्यात आले होते, तसेच महापूजा, हनुमान चालीसा, मंत्र जप, तसेच भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले होते,यावेळी मंदिराचे ट्रस्टी डॉ. शाम राजोरे, आशिष राजोरे, सुशील खंडेलवाल, सुशील घिया, पुजारी रणजीत शुक्ला तसेच मंदिराचे सर्व कर्मचारी भक्तगण उपस्थित होते
byMEDIA POLICE TIME
-
0