*अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू*. (पारोळा तालुका प्रतिनिधी यशवंत पाटील) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सबगव्हाण टोलनाक्याजवळ एका बावीस वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक १४ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यातील दळवेल येथील योगेश्वर राजेंद्र पाटील (वय २२) यांचे सबगव्हाण टोल नाक्याजवळील मराठी शाळेजवळ गॅरेज असून ते मुक टी येथून काहीतरी स्पेअर पार्ट घेऊन सबगव्हाण टोल नाक्याजवळ आले असता त्यावेळेस गॅरेज कडे वळण घेत असताना एका अज्ञात वाहनाने त्यास धडक दिल्याने त्याचा डोक्यास जबर दुखापत झाली. यावेळी अज्ञात वाहन चालक हा सबगव्हाण टोल नाक्याजवळ फरार झाला असून तो सीसीटी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जखमी योगेश्वर यास महामार्गाची रुग्णवाहिकेतून डॉ. संदीप पाटील यांनी त्यास पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता त्यास डॉक्टर निखिल बोरा यांनी तपासून मयत घोषित केले. पुढील तपास पारोळा पोलीस करीत आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0