लालूप्रसाद यांचा सर्व जातींना राजकीय सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी विचार अमलात आणण्यासाठी प्रहार उमेदवाराला समर्थन. ( रावेर तालुका प्रतिनिधी रशीद तडवी)रावेर विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेस भाजप या दोन्ही पक्षाला वारंवार संधी दिली असली तरी त्यांनी रावेर विधानसभेचा योग्य तसा विकास केला नसल्यामुळे आणि उपेक्षित आणि मोठ्या प्रमाणावर प्रचंड समस्या निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचा समर्थन बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे उमेदवार श्री अनिल भाऊ चौधरी यांना समर्थन देत असल्याचे आज रोजी श्री राष्ट्रीय जनता राज्य नेते प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी प्रचंड जाहीर सभेत आपले मत व्यक्त केलेरावेर येथे अनिल चौधरी यांच्या सभेला बच्चू कडू सह राष्ट्रीय जनता दराचे नेते श्री प्रशांत बोरकर प्रहार चे उमेदवार अनिल भाऊ चौधरी राष्ट्रवादीचे नेते संतोष चौधरी यांनी संबोधित केले रावेर यावल भागातील प्रश्नावर श्री प्रशांत बोरकर यांनी जोरदार हल्ला सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांवर चढवला रावेर तालुक्याच्या प्रश्नांबाबत कोणत्याही प्रकारची दखल न घेता रावेर तालुक्यातील प्रश्नावर जाणून बुजून अन्याय केला जातो रस्ते रेल्वेच्या प्रश्नावर मुद्दावून अन्याय केला जातो पत्रकारांना येथील समस्यांबाबत आम्हाला सातत्याने लढा द्यावा लागतो परंतु इंडिया आघाडीचे घटक पक्ष असल्यानंतर सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून दुजाभाव केला जातो राष्ट्रीय जनता दलाची महाराष्ट्रामध्ये सहा ते दहा टक्के मतदान असल्यानंतर युपी बिहारी यांची 50 ते 60 लाख मतदार सुद्धा आमच्या मतदारांकडे व राष्ट्रीय जनता दल मित्र पक्षाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जाते लोकसभेमध्ये कोणत्याही अभिलाषा न ठेवता समर्थन दिल्यानंतरही कोणत्याही मानसन्मान गरीब जनतेला मिळत नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला सरसकट पाठिंबा न देता स्थानिक उमेदवारांची जुळवून घेणाऱ्या कार्यकर्त्यांना समर्थन देण्याची भूमिका राष्ट्रीय जनता दलाने घेतलेले आहे त्यावरून तसेच लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये उपेक्षित समाजाला ज्या पद्धतीने प्रतिनिधित्व मिळवून दिलेले आहे त्याच पद्धतीने ओबीसी आदिवासी अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्यासाठी अनिल चौधरी सारख्या छोट्या समाजातील उमेदवाराला समर्थन करण्याचे धोरण घेतल्याचे प्रशांत बोरकर यांनी सांगितले प्रशांत बोरकर यांच्या भाषणांमुळे रावेर यावल तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर धक्कादायक निर्णयाची शक्यता निर्माण झालेली आहे प्रशांत बोरकर यांच्या राष्ट्रीय जनता दराच्या समर्थनांमुळे अनिल चौधरी यांचे पारडे जड झालेले आहे प्रशांत बोरकर राष्ट्रीय जनता दलाला मानणारा मोठा वर्ग जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये आहे

लालूप्रसाद यांचा सर्व जातींना राजकीय सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी विचार अमलात आणण्यासाठी प्रहार उमेदवाराला समर्थन.                                                            
Previous Post Next Post