फैजपुरातील एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यालयात मीडियाचे काम पाहणाऱ्या एका दलाला कडून पत्रकारांबद्दल भेदभाव.. (फैजपूर प्रतिनिधी सलीम पिंजारी )यावल येथील रावेर यावल विधानसभा मतदार संघातील एका राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार यांचे संपर्क कार्यालय सुरू असून त्यांच्या कार्यालयात बातम्या जाहिराती आणि पेड न्यूज साठी रावेर यावल तालुक्यातून बहुतेक पत्रकार तेथे संपर्क कार्यालय सुरू झाल्यापासून संपर्क करीत आहे परंतु या ठिकाणी काही पत्रकारांना भेदभावाचा सामना एका पाटील नामक दलाल व्यक्ती कडून केला जात आहे रावेर विधानसभा मतदार संघाच्या कार्यालय मध्यवर्ती ठिकाण म्हणून फैजपूर येथे सर्वांना सोयस्कर होईल म्हणून ठेवण्यात आले आहे रावेर यावल तालुक्यातून बहुतेक पत्रकार या ठिकाणी संपर्कासाठी येत आहे परंतु या व्यक्तीकडे मीडियाचा कारभार असल्याने त्याच्याकडे संपर्क करावा लागतो परंतु काही मोजके वृत्तपत्राचे पत्रकारांनाच हा दलाल माहिती आणि जाहिराती आणि पेड न्यूज भेदभाव करून देत असल्यामुळे येथील रावेर यावल विधानसभा मतदारसंघातील बहुतेक पत्रकारांना यापासून वंचित ठेवले जात आहे त्यामुळे रावेर यावल मतदार संघातील अनेक पत्रकारांची सरळ उमेदवाराबाबतच नाराजी पसरली आहे हा दलाल रावेर मतदार संघाचा नसून बाहेरच्या मतदार संघाचा असल्यामुळे हा येथे भेदभाव करीत असल्याचा आरोप होत आहे येथील पत्रकारांबद्दल असलेला भेदभाव च्या परिणाम येथील राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार यांच्यावर होणार असल्याचे चिन्ह आहे

फैजपुरातील एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या कार्यालयात मीडियाचे काम पाहणाऱ्या एका दलाला कडून पत्रकारांबद्दल भेदभाव..                                             
Previous Post Next Post