*पारोळा येथे गुरूनानक जयंती साजरी* (पारोळा तालुका प्रतिनिधी) :- येथे सिंधी समाज पंचायतीच्या वतीने सालाबादाप्रमाणे गुरूनानकदेव व सिंधी समाजाचे महान संत बाबा ज्युडियाराम साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सकाळी प्रभातफेरी काढून ढोल टाळ वाजत रामनामाचा गजर करण्यात आला.प्रभातफेरी संत ज्युडियाराम मंदिरात आल्यानंतर गुरूनानकदेव व ज्युडियाराम यांच्या प्रतिमांचे पंचामृताने अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या कार्तिक स्वामींच्या कथेचे विधिवत समापन करण्यात आले. त्यानंतर सांयकाळी सात वाजता मागील एका महिन्यापासून सुरू असलेल्या गुरू ग्रंथसाहेब वाचन पूर्ण करून ग्रंथ साहेबांना भोगसाहेब पूर्ण करण्यात आले. त्यानंतर गुरूनानकदेव व बाबा ज्युडियाराम साहेब यांची जयंती अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली. कोणताही अतिरिक्त खर्च न करता समाजाच्या वतीने गोशाळेत अन्नदान व गरजूंना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
byMEDIA POLICE TIME
-
0