*ट्रॅक्टरच्या धडकेत पारोळ्याचा तरूण ठार* (पारोळा बापूसाहेब वाडिले )पारोळा :- येथील तरूण अमळनेर येथे कामानिमित्त गेला असता तिकडून येत असतांना समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर ने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर पारोळा रस्त्यावर जिनिंग जवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली याबाबत अधिक माहिती अशी की गिरीधर इंदरलाल लुल्ला (सिंधी) वय वर्ष ४२ रा जैन मंदिरासमोर हत्ती गल्ली पारोळा हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच १९ बी एच ६६३८ वर पारोळा जाण्यासाठी अमळनेरहून निघाले. सुमारे ८ वाजेच्या सुमारास एका विना नंबरच्या ट्रॅक्टरने समोरून जोरदार धडक दिल्याने ते मोटरसायकल सह खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागून ते रक्तबंबाळ झाले. कुणीतरी त्याच्या मोबाईल वरून त्यांचे नातेवाईक अमळनेर येथील व्यापारी रविकुमार वसंतकुमार माधवाणी रा. सिंधी कॉलनी अमळनेर याना कळविले त्यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला रविकुमार यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात ट्रॅक्टर चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.चौकट ----दहा दिवसांत तीन मृत्यू ने समाज हादरलाशहरातील दोन हरहुन्नरी तरूणांचा एकापाठोपाठ मृत्यू व एका जेष्ठ नागरिकांच्या मृत्यूने संपूर्ण सिंधी समाजावर शोककळा पसरली आहेशहरात आगोदरच अल्प प्रमाणात असलेल्या सिंधी समाजात अवघ्या दहा दिवसांत तीन व्यक्तीच्या मृत्यू झाल्याने संपूर्ण समाज हादरला आहे यात शहरातील एका जेष्ठ व्यक्तीचे ऐन दिवाळीच्या तोंडावर ३१ ॲक्टोंबर रोजी नारायणदास लालवाणी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यानंतर अवघ्या पाच दिवसात शहरातील सर्वांच्या सुख दुःखात कोणत्याही वेळप्रसंगी धावुन येणारा ३५ वर्षीय प्रशांत उर्फ गोलु नागदेव यांचे आपघाती निधन झाले नंतर लगेचच चार दिवसांच्या अंतराने येथील तरूण ३६ वर्षीय गिरधर लुल्ला (सिंधी) यांचे अमळनेर जवळील जिन जवळ अपघातात मृत्यू झाला यासर्व घटना एका पाठोपाठ घटल्याने शहरातील संपूर्ण समाजच हादरला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0