डॉ हिना गावित यांनी झंझावाती प्रचार तब्बल १८ दुर्गम गावांमधुन संपर्क.. (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी)अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संसद रत्न डॉ हिना गावित या अक्कलकुवा-अक्राणी तालुक्यातील प्रत्येक भागात गाव पाड्यात जाऊन प्रत्येक्ष संपर्क करण्यावर भर देत आहेत. त्या अंतर्गत आज १५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी एकच दमात तब्बल १८ गावामधून जोरदार प्रचार फेरी काढून मतदारांची प्रत्यक्ष संपर्क साधला. डीजे च्या तालावर थिरकणारी तरुणाई, ढोल ताशांचे पथक, मतदारांच्या उस्फुर्त सहभाग आणि प्रतिसाद हे या रॅली चे मोठे वैशिष्ट्य ठरले. अक्कलकुवा,खटवाणी, ब्रिटिश अंकुश विहीर,अंबाबारी, नवा नगरमुथ्था, खापर, मोहपाडाफाटा, देव मोगरा माता मंदिर, नवापाडा,गव्हाळी, काकड्या आंबा, तालाबा,रामपुर, शेदवाण, मोरांबा, रोजकुंड, महु पाडा, काकरकुंड, मोगरा पाणी, देव मोगरा पुनर्वसन, या गावाचा यांस समावेश होता. नागेश दादा पाडवी, यशवंत पावरा, सुभाष आप्पा पावरा, शिवाजी पराडके,प्रताप वळवी यांसह तोरणमाळ, धडगांव, मोलगी, रोषमाळ, अक्कलकुवा,खापर यासर्व भागातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सहभाग झाले होते. दरम्यान शुक्रवार रोजी भगदरी,काकडीआंबा, कात्री, कात्री घाट, खंबारा, खुटामोडी, कुंदलवड,पौला आणि अन्य गावामधून डॉ हिना गावित यांच्या कॅनर सभा पार पडल्या दरम्यान कॅनर सभामधील भाषणातून त्यांनी सांगितले की वर्षांनुवर्षे दुर्लक्षित अक्कलकुवा अक्राणी चा दुर्गम भाग प्रगतीच्या प्रमुख प्रवाहात आणायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी पुन्हा एकदा विश्वासाने शेगडीच्या चिन्हावर शिक्का मारुन माला संधी द्यावी. आपण सर्व मतदारांनी दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिल्याने नंदुरबार जिल्ह्यातील पहिली महिला बनविण्याचे सौभाग्य लाभले.त्या दहा वर्षात एक महिला म्हणून या दुर्गम भागातील समस्त महिलांच्या व्याथा वेदना, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले आणि अक्कलकुवा अक्राणी तालुक्यात विक्रमी स्वरुपात गॅस वाटप केले. महिलांना लक्षात घेऊनच आरोग्य केंद्र आणि वीज, पाणी संदर्भात उपाय योजना केल्या रस्ता विकास केला अस्तंबा आणि सावऱ्यादिगर तोरणमाळ सारख्या दुर्गम दुर्गम भागाला पुल, काँग्रेटी रस्ते मिळवून दिले.आमदार म्हणून निवडून आल्यानंतर याच प्रकारे गतिमान विकास केला जाईल आणि हा भाग विकासाच्या दृष्टीने प्रवाहात आणुन दाखवेन डॉ हिना गावित म्हणाल्या.
byMEDIA POLICE TIME
-
0