*अल्फाबेट स्कूलमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरा* (*मोलगी अक्कलकुवा प्रतिनिधी) तालुक्यातील मोलगी येथील मुळबीज शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरा करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सागर पाडवी, शाळेचे उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे तर अध्यक्षस्थानी शाळेच्या शिक्षिका सरीता पाडवी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका मथुरा वसावे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. प्रस्तावनेत त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली व इतिहासातील निवडक प्रसंग पटवून दिले. त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. सागर पाडवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणादायक व्यक्तिमत्वावर प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले व शाळेचे उपमुख्याध्यापक ईश्वर वसावे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेतील सहाय्यक शिक्षिका प्राची पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सरीता पाडवी यांनी अध्यक्षीय भाषणात विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूलचे प्रिंसिपल गोटूसिंग वळवी यांनी तर आभार लीला पाडवी यांनी मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0