*तलाठी अरुण पाटील यांना क्रिडा स्पर्धेत गोल्ड मेडल.. तहसीलदार उल्हास देवरे यांच्या हस्ते सन्मान..* (पारोळा तालुका प्रतिनिधी यशवंत पाटील )पारोळा :- तालुक्यातील धुळपिंप्री सजाचे तलाठी अरुण पाटील यांनी जळगाव येथील आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माजी सैनिक यांच्या क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल पारोळा येथील तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांच्या हस्ते मेडल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सदर चांगल्या कामाची पावती नेहमीच अग्रहित असते व त्याचे फळही मिळते असे त्यांनी बोलून दाखविले. यावेळी शहर तलाठी निशिकांत माने ( पाटील ) शिरसाट आप्पा साळुंखे नायब तहसीलदार,व भिकन बाबुराव बोरसे कृषी अधिकारी पंचायत समिती पारोळा संदीप सुपडू पाटील विस्तार, अधिकारी कृषी पंचायत समिती पारोळा. परसुराम शिंदे .सागर कोळी तसेच बावीस्कर आप्पा, प्रशांत निकम, राष्टीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान, दिनकर पाटील ( पोलीस पाटील भोलाणे ) यांनी व तालुक्यातील सर्व तलाठी, तहसील कर्मचारी आदिंनी त्यांचे अभिनंदन व्यक्त केले.दक्ष पोलीस टाइम्स परिवारातर्फे मनपूर्वक अभिनंदन.

तलाठी अरुण पाटील यांना क्रिडा स्पर्धेत गोल्ड मेडल.. तहसीलदार उल्हास देवरे यांच्या हस्ते सन्मान..*                      
Previous Post Next Post