*विवाहितेसह दोन अल्पवयीन मुली बेपत्ता* (पारोळा तालुका प्रतिनिधी ) चोरवड येथील एका तीस वर्षीय विवाहितेसह दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाले. याबाबत जितेंद्र पाटील यांनी पारोळा पोलीसात खबर दिली की, त्यांची पत्नी कल्याणीबाई जितेंद्र पाटील (३०), यशोदा जितेंद्र पाटील (१०) व तनवी जितेंद्र पाटील (५) सर्व रा. चोरवड ता. पारोळा हे दिनांक सतरा रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पारोळा शहरातील बसस्थानक येथून दुकानातून वस्तू घेऊन येते असे सांगून गेले परंतु अद्याप ते न परतल्याने याबाबत आज पारोळा पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0