*सर्पमित्राने दिले बिनविषारी मांडूळ सापाला जिवदान* ( पारोळा तालुका प्रतिनिधी) पारोळा येथील योगेश्वर नगरात, श्री सुभाष साहेबराव पाटील यांना त्यांचा घराजवळ साप दिसल्याने त्यांनी सापाला न मारता त्याला पकण्यासाठी पारोळा कार्यरत जीवरक्षक चॅरिटेबल संस्थेशी संपर्क केला. या संस्थेतील सर्पमित्र भूषण पाटील, प्रवीण जगताप व अमोल महाजन यांनी विलंब न करता प्रत्यक्ष तेथे जाऊन सापाची पाहणी केल्यावर तो बिनविषारी मांडूळ जातीचा साप दिसून येत त्याला सुरक्षित पकडले. यावेळी सर्पमित्रांनी उपस्थिती नागरिकांना सापाबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली. वनरक्षक सुवर्णा कुंभोरे यांच्या मार्गदर्शनात सापाला जंगलात सुरक्षित सोडून जिवदान देण्यात आले.

सर्पमित्राने दिले बिनविषारी मांडूळ सापाला जिवदान*             
Previous Post Next Post