*आदर्श शिक्षकाने केला यशवंत विद्यार्थिनीचा गौरव* धुळे येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी. टेक.(मेकॅनिकल) ची विद्यार्थिनी दुर्गेश्वरी बापुराव पाटील हिने आंतर महाविद्यालयीन आविष्कार स्पर्धेत मायक्रोस्कोपची प्रतिकृती सादर करुन सुवर्ण पदक पटकावले व कोल्हापूर येथे होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. या बद्दल येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी तिला आपल्या निवासस्थानी बोलावून अभिनंदन पत्र, गौरव पत्र व रोख बक्षीस रुपये दोनशे पन्नास मात्र देऊन भावपूर्ण सत्कार केला. आणि विद्यापीठ स्तरीय स्पर्धा, पुढील वाटचाल व उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम आशीर्वाद दिले. कु. दुर्गेश्र्वरी व तिच्या पालकांनी भावसार सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन आभार मानले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

