११ ला बच्चू कडू यांची भद्रावतीत जाहीर सभा. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती ) भद्रावती,दि.९;-वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार ऐतेशाम अली यांच्या प्रचारार्थ प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आ.बच्चू कडू यांच्या जाहीर सभेचे आयोजन येथील शिंदे महाविद्यालयाच्या प्रांगणात दि.११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते ॲड.वामनराव चटप उपस्थित राहणार आहेत. सभेला शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग व महिला यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विठ्ठल बदखल यांनी केले आहे.

११ ला बच्चू कडू यांची भद्रावतीत जाहीर सभा.           
Previous Post Next Post