सगरोळी येथे.ग्रामदैवत शंभू महादेव मंदिराचे,मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा. (मारोती एडकेवार सर्कल: प्रतिनिधी सगरोळी )सगरोळी : सगरोळी येथे श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदार पीठ, व सर्व शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत, शंभू महादेव मंदिराचे जिर्णोद्वार शिवलिंग,वीरभद्र मूर्ति प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा, दि. 31/1/2025 रोजी सकाळी 9:30 वाजता आयोजित केले आहे, दि. 30/1/2025 रोजी सायंकाळी 4:00 वाजता श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामी केदार पीठ, व बसवलिंग शिवाचार्य महाराज जुकलकर, शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर,सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदेकर,मलकारजून शिवाचार्य महाराज खतगावकर, सिद्ध्याळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर,शंकर लिंग शिवाचार्य महाराज हाणेगावकर, वीरपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर,चंद्रशेखर महाराज देगलूरकर, बसवलिंग शिवाचार्य महाराज कौलासकर,राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर, आचार्य गुरुराज स्वामी अहमदपूरकर,सिद्धेश्वर महाराज सुखणीकर, शिधायप्पा महाराज एकलारकर,यांचे मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक निघेल. व यानंतर सायंकाळी 7:00 वाजता प्रवचन होईल. तसेच दि.31/1/2025 रोजी सकाळी 9:30 वरील सर्व गुरुवर्य यांच्या उपस्थित व श्री 1008 जगद्गुरु भीमाशंकर शिवाचार्य महास्वामी केदार पीठ,यांच्या शुभहस्ते शंभू महादेव मंदिराचे व वीरभद्र मूर्ति प्राण प्रतिष्ठा कलश रोहन सोहळा, आयोजन करण्यात आले आहे,तरी सगरोळी सर्कल व पंचक्रोशीतील सर्व समाज बांधवांनी, व नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आव्हान महादेव मंदिर समिती समस्त गावकरी मंडळी सगरोळी यांच्याकडून करण्यात आले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0