*संविधानाचे मानवी जीवनातील महत्व*.. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती मोबाईल, इंटरनेट, टीव्ही यांसारख्या उपकरणांचा वापर चुकीच्या पद्धतीने करून आपला वेळ वाया घालवत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला चालना मिळताना दिसून येते. माणूस स्वतःचा सार्थक साधण्यात व्यस्त आहे, त्यासाठी कोणाचे नुकसान झाले तरी कोणाला पर्वा नाही. हीच परिस्थिती पुढे राहिल्यास मानवी समाज जेवढे प्रगती करेल तितकाच अधोगतीला मिळाल्याशिवाय राहणार नाही. याउलट मोबाईल टीव्ही इंटरनेट यांचा वापर भारतीय संविधानाचा अभ्यास करण्यात केला तर देशाची आर्थिक, राजकीय, सामाजिक परिस्थिती बदलण्यास मदत मिळेल. भारत स्वतंत्र होण्याच्या आधी भारतावर इंग्रजांनी राज्य केले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या राज्यघटनेप्रमाणे जाचक कायदे भारतीय नागरिकांवर लादले. व भारताच्या आर्थिक लूट करण्यास सुरुवात केली सामाजिक भावना दुखावण्याचे काम इंग्रजांच्या राज्यघटनेने केले, जाते धर्मात भांडणे लावण्याचे काम केले, यामुळे भारत विकासाच्या प्रवाहातून मागे फेकला गेला.. आपल्या भारत देशात वैदिक, पौराणिक, धार्मिक असे विविध ग्रंथ आहेत. यातून आपणास विविध प्रकारची माहिती मिळते. सर्वच जाती धर्माचे स्वतंत्र ग्रंथ भारतात आहेत, उदा. गीता कुराण बायबल आदी पवित्र व पूजनीय ग्रंथ आहेत. हे सर्व पवित्र ग्रंथ आपणास जीवन कसे जगावे याची एक समान शिकवण देतात. याचा प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास मानवी जीवनात अमुलाग्र असे बदल घडताना दिसून येतात. सर्व ग्रंथांचा अभ्यास करून त्याची वैज्ञानिक सांगड घालून ज्ञान आत्मसात करता येते व जीवन सुकर करता येते.. आपल्या जीवनात मुलाग्र बदल घडवण्याचा काम भारतीय संविधान करते. भारतीय संविधान आपणास कसे व का जगावे शिकवण देते. मानवावर होणारे अन्याय अत्याचार यावर आवाज उठवायला, न्यायालयीन दाद मागायला संविधान महत्त्वाचे भूमिका बजावते. भारतातील सर्व शासकीय कामकाज हे सर्व संविधानिक पद्धतीने पारदर्शकपणे चालते. भारताला राजकारणात वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम भारतीय संविधान करते. *पिढ्या ना पिढ्या शस्त्र परजली पण कोपराहिना हलला, बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला* . भारताचि राज्यघटना लिहिण्यासाठी भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस हा कालावधी लागला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशात स्वतंत्र भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला मंजुरी मिळालि वं 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र भारताचे संविधान अंमलबजावणीसाठी लागू झाले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतीय झेंड्याला सलामी दिले जाते.. भारतीय संविधानात पवित्र राष्ट्रीय ग्रंथ आहे ज्यामुळे सर्वांना समान नागरी अधिकार कायदा, स्त्री -पुरुष समानता, सती प्रथा, कामगार कायदा सर्वांना समान मतदानाचा अधिकार मिळाले. भारतीय संविधान प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य देते, सर्वांना मूलभूत अधिकार, स्वतंत्र विचार मांडण्याच्या अधिकार, मताचा अधिकार माहितीचा अधिकार श्रद्धेचा अधिकार अन्यायाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आंदोलनाचा अधिकार पत्रकारिता, सर्व जनतेचे कल्याणकारी कायदे आपणास भारतीय संविधान बहाल करते, त्यामुळे देश सुरळीत चालतो. भारतीय संविधान लोकशाहीचा स्तंभ आहे. एक ना अनेक असे जणकल्याणकारी कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील माणसाला बहाल केले, खऱ्या अर्थाने भारतीय संविधान जगात एक नंबर आहे अस मत तज्ञ जागतिक पातळीवर व्यक्त करतात. सर्वांनी संविधानाचा काटेकोरपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. संविधान ज्ञानाचे व प्राण्याचे भंडार आहे. असे महान संविधान भारताला दिल्याबद्दल आपण सर्वांचे मूलभूत कर्तव्य म्हणून सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार व्यक्त करणे गरजेचे आहे.धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान - लेखक - आकाश रविंद्रनाथ भालेराव. ( उपशिक्षक, त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय रावेर ) 8806782610. रा. शेमळदे ता. मुक्ताईनगर जि.जळगाव.

संविधानाचे मानवी जीवनातील महत्व*..                                               सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती मोबाईल, इंटरनेट, टीव्ही यांसारख्या उपकरणांचा वापर  चुकीच्या पद्धतीने करून आपला वेळ वाया घालवत आहे. त्यामुळे गुन्हेगारीला चालना मिळताना दिसून येते. माणूस स्वतःचा सार्थक साधण्यात व्यस्त आहे, त्यासाठी कोणाचे नुकसान झाले तरी कोणाला पर्वा नाही. हीच परिस्थिती पुढे राहिल्यास मानवी समाज जेवढे प्रगती करेल तितकाच अधोगतीला मिळाल्याशिवाय राहणार नाही.                           याउलट मोबाईल टीव्ही इंटरनेट यांचा वापर भारतीय संविधानाचा अभ्यास करण्यात केला तर देशाची आर्थिक, राजकीय,  सामाजिक परिस्थिती बदलण्यास मदत मिळेल.                                         भारत स्वतंत्र होण्याच्या आधी भारतावर इंग्रजांनी राज्य केले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या राज्यघटनेप्रमाणे जाचक कायदे भारतीय नागरिकांवर लादले. व भारताच्या आर्थिक लूट करण्यास सुरुवात केली सामाजिक भावना दुखावण्याचे काम इंग्रजांच्या राज्यघटनेने केले, जाते धर्मात भांडणे लावण्याचे काम केले, यामुळे भारत विकासाच्या प्रवाहातून मागे फेकला गेला..                                   आपल्या भारत देशात वैदिक, पौराणिक, धार्मिक  असे विविध ग्रंथ आहेत. यातून आपणास विविध प्रकारची माहिती मिळते. सर्वच जाती धर्माचे  स्वतंत्र ग्रंथ भारतात आहेत, उदा. गीता कुराण बायबल आदी पवित्र व पूजनीय ग्रंथ आहेत. हे सर्व पवित्र ग्रंथ आपणास जीवन कसे जगावे याची एक समान शिकवण देतात. याचा प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास मानवी जीवनात अमुलाग्र असे बदल घडताना दिसून येतात. सर्व ग्रंथांचा अभ्यास करून त्याची वैज्ञानिक सांगड घालून ज्ञान आत्मसात करता येते व जीवन सुकर करता येते..                आपल्या जीवनात मुलाग्र बदल घडवण्याचा काम भारतीय संविधान करते. भारतीय संविधान आपणास कसे व का जगावे शिकवण देते. मानवावर होणारे अन्याय अत्याचार यावर आवाज उठवायला, न्यायालयीन दाद मागायला संविधान महत्त्वाचे भूमिका बजावते. भारतातील सर्व शासकीय कामकाज  हे सर्व संविधानिक पद्धतीने पारदर्शकपणे चालते. भारताला राजकारणात वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम भारतीय संविधान करते.                                             *पिढ्या ना पिढ्या शस्त्र परजली पण कोपराहिना हलला, बाबासाहेब तुम्ही फक्त पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला* .                            भारताचि राज्यघटना लिहिण्यासाठी भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस हा कालावधी लागला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाल्यानंतर भारत देशात स्वतंत्र भारतीय संविधान 26 नोव्हेंबर  1949 ला मंजुरी मिळालि वं 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र भारताचे संविधान अंमलबजावणीसाठी लागू झाले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतीय झेंड्याला सलामी दिले जाते..             भारतीय संविधानात पवित्र राष्ट्रीय ग्रंथ आहे ज्यामुळे सर्वांना समान नागरी अधिकार कायदा, स्त्री -पुरुष समानता, सती प्रथा, कामगार कायदा सर्वांना समान मतदानाचा अधिकार मिळाले. भारतीय संविधान प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्य देते, सर्वांना मूलभूत अधिकार, स्वतंत्र विचार मांडण्याच्या अधिकार, मताचा अधिकार माहितीचा अधिकार श्रद्धेचा अधिकार अन्यायाच्या विरोधात बोलण्याचा अधिकार आंदोलनाचा अधिकार पत्रकारिता, सर्व जनतेचे कल्याणकारी कायदे आपणास भारतीय संविधान बहाल करते, त्यामुळे देश सुरळीत चालतो. भारतीय संविधान लोकशाहीचा स्तंभ आहे. एक ना अनेक असे जणकल्याणकारी  कायदे  बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील माणसाला बहाल केले, खऱ्या अर्थाने भारतीय संविधान जगात एक नंबर आहे अस मत तज्ञ जागतिक पातळीवर व्यक्त करतात. सर्वांनी संविधानाचा काटेकोरपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. संविधान ज्ञानाचे व प्राण्याचे भंडार आहे. असे महान संविधान भारताला दिल्याबद्दल आपण सर्वांचे मूलभूत कर्तव्य म्हणून सर्वांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आभार व्यक्त करणे गरजेचे आहे.धन्यवाद जय हिंद जय भारत जय संविधान     -  लेखक - आकाश रविंद्रनाथ भालेराव. ( उपशिक्षक, त्र्यंबकेश्वर माध्यमिक विद्यालय रावेर ) 8806782610. रा. शेमळदे ता. मुक्ताईनगर जि.जळगाव.
Previous Post Next Post