भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन अजंदे ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा..: रावेर तालुक्यातील अजंदे ग्रामपंचायत तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितू इंगळे त्यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना वही आणि पेन वाटप करण्यात आले...२६ जानेवारीला भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळा-कॉलेजमध्ये ध्वजवंदन करून विविध कार्यक्रम आयोजित केले जागात. दिल्लीत परेडचे आयोजन केले जाते. तसेच तिथे विविध राज्यांचे देखावेही सादर केले जातात. हा दिवस देशभरात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो... तसेच अजंदे गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष अनिल कोळी यांच्या हातून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितू इंगळे.सदस्य सचिन सोनवणे. शेख आदिल. रिंकू न्हावी. रंजिता सावकारे.व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण चिंधुजी. उपमुख्याध्यापक श्री विठ्ठल बबन धुमाळ. कुमारी गायत्री गोविंदा पाटील. अंगणवाडी सेविका प्रतिभा पाटील नीलिमा पाटील मायाबाई सोनवणे कोकिळाबाई सोनवणे. रवींद्र इंगळे. छोटू बिरपण. पिंटू कोळी .ग्रामसेवक यास्मिन बानो. सरपंच दत्तात्रय मांडवकर. पूर्ण ग्रामपंचायत टीम. आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन अजंदे  ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा..:                                       
Previous Post Next Post