न्यू हायस्कूल मध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू : दि.10 येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनसाठी निरोप समारंभाचे 9 वी च्या विद्यार्थांनी आयोजन केले होते. कै विनायकराव पाटील व सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्य क्रमाचे अध्यक्ष मुख्या ध्यापक के व्ही मोरे तसेच पर्यवेक्षक धनंजय भागवत, दिनकर नखाते शरद मगर, भाऊसाहेब निकम आदींची या कार्यक्रमा स प्रमुख उपस्थिती होती. करिष्मा ढेंबरे या विद्यार्थिनीने स्वागत गीत गायले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक रामेश्वर गाडेकर यांनी केले. याप्रसंगी रेणुका ताठे, ज्ञानेश्वरी गडदे, मयुरी हजारे, प्रतिक्षा खरात व त्रिरत्न सावंत या विद्यार्थ्यांनीआपले मनोगत भाषणातून मांडले. तसेच एस टी नागरे, ए एस सावंत, जि के तोटेवाड, डी सी सोळंके,डी एस मोरे, आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर के व्ही मोरे, धनंजय भागवत यांनी परीक्षेसंबंधी महत्वा च्या सूचना व परीक्षे साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रूपाली शिंदे केले तर आभार जी एस रोंटेवाड यांनी मानले. कार्यक्रमास इयत्ता 9 व 10 वीचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण काष्टे व विष्णू गजमल यांनी प्रयत्न केले.

न्यू हायस्कूल मध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.         
Previous Post Next Post