*उक्कलगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे एन. एम. एम. एस. परीक्षेत यश.. (*मानवत // प्रतिनिधी).मानवत तालुक्यातील मौजे उक्कलगांव जि. प. प्राथमिक प्राथमिक शाळेतील पाच विद्यार्थी एन. एम. एम. एस. परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत यामध्ये *109* गुण घेऊन कुमारी *दिव्या आसाराम पिंपळे* विद्यार्थ्यांनीचा प्रथम क्रमांक, 90 गुण घेऊन सर्व द्वितीय कृष्णा दिगंबर पिंपळे व 83 गुण मिळवत अनुजा रामेश्वर उक्कलकर ही विद्यार्थिनी तृतीय तर 80 गुण घेऊन सुदर्शन केशवराव पिंपळे व 72 गुण घेऊन कु.श्रृती सचिन पिंपळे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक श्री विलास मिटकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या व गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धुराजीराव उक्कलकर ग्राम पंचायतीचे सरपंच श्री उत्तमराव गायकवाड शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री लक्ष्मणराव पिंपळे माजी मुख्याध्यापिका तथा केंद्रप्रमुख मोरेगाव ता सेलू *श्रीमती मायादेवी गायकवाड* मॅडम उक्कलगांव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अहेमद शेख , पालक श्री आसारामजी पिंपळे श्री दिगंबरराव पिंपळे श्री रामेश्वरराव उक्कलकर श्री केशवराव पिंपळे श्री सचिन पिंपळे यांच्यासह यावेळी शाळेतील शिक्षक बंधू-भगिनी विद्यार्थी व शिक्षणप्रेमी नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.***
byMEDIA POLICE TIME
-
0