**हत्तलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिंदे तर उपाध्यक्षपदी भगवान शिंदे यांची सर्वानूमते निवड. (.*मानवत // प्रतिनिधी.)हत्तलवाडी येथील ज्ञानेश्वर शिंदे यांची शालेय समितीचे अध्यक्षपदी, भगवान शिंदे यांची उपाध्यक्षपदी दुसऱ्यांदा सर्वानूमते बिनविरोध निवड हत्तलवाडीत आनंदाचे वातावरण मानवत तालुक्यातील मौजे हत्तलवाडी येथील शालेय समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. हत्तलवाडी शालेय समितीची पुनर्गठन करण्यासाठी पालक सभा दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आली. यावेळी शाळेचे सचिव होगे पी जी मुख्याध्यापक त्यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला व समिती निवडीचे निकष व कर्तव्य याबद्दल माहिती दिली तसेच प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना व प्रत्येक समाजातील घटकांना प्रतिनिधित्व मिळेल व 50 टक्के महिला समितीत राहतील असे आरक्षण सोडण्यात आले आहे असे त्यांनी वाचून दाखवले नंतर प्रत्येक सदस्य निवडण्यात आले सर्व सदस्यांची निवड ही एकमताने बिनविरोध करण्यात आली निवडलेल्या सदस्या मधून मागील शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडीबा शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी भगवा रामभाऊ शिंदे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच यावेळी सदस्य म्हणून शेख इमरान उस्मान विनोद कारभारी शिंदे सौ सीमा अशोक तुपसमुंदर विष्णू प्रकाश कापसे सौ सरस्वती विलास पूकाने सुरेश नाथा तुपसमुंदर रमा शिवाजी तुपसमुंदर सो अनिता गंगाधर मोगरे प्रताप साहेबराव कापसे सौ अरुणा त्र्यंबक शिंदे सौ आशामती भगवान पुकाने व शिक्षण तज्ञ म्हणून माणिक आन्नासीराम शिंदे यांची निवड करण्यात आली. तर यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रुद्र कांचन शिंदे व ऋतुजा गणेश शिंदे स्थानिक स्वराज्य संस्था मधून सौ छाया सुरेशराव शिंदे यांची निवड करण्यात आली शिक्षक प्रतिनिधी म्हणून नेवरेकर एस डी यांची निवड करण्यात आली तसेच या निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य कृष्णा शिंदे पाटील , शिवसेना शिंदे गट तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे पाटील , माऊली शिंदे घनश्याम शिंदे माणिक शिंदे सुदर्शन माणिकराव शिंदे विनोद शिंदे बालासाहेब तूपसमुंदर गंगाधर मोगरे सौ स्वप्नना मिलिंद तूपसमुंदर सौ रेवता घनश्याम शिंदे तसेच विद्यार्थ्याचे आई-वडील पालक प्रतिनिधी यांचे सर्वांचे अनमोल असे सहकार्य लाभले या निवडीसाठी शाळेतील शिक्षक जयवंत ठाकरे जे एस व्ही पी नेवरेकर एच डी मुळे डी जी श्रीमती कालवीट एस आर श्रीमती गवळे यु जी या शिक्षक मंडळीने परिश्रम घेतले.यावेळी शाळेचे सचिव पंढरीनाथ होगे यांनी सर्वांचे आभार मानले शालेय समितीचे अध्यक्ष बिनविरोध व एकमताने ज्ञानेश्वर शिंदे तर उपाध्यक्ष म्हणून भगवान शिंदे व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या हात्तलवाडी येथील शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी बिनविरोध अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करून तालुक्यातील गावांना एक आदर्श घालून दिला आहे. या निवडी बद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.***

हत्तलवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिंदे तर उपाध्यक्षपदी भगवान शिंदे यांची सर्वानूमते निवड.                                                                         
Previous Post Next Post