तिरळे कुणबी समाज भद्रावती  तर्फे विदर्भस्तरीय वधु - वर परिचय मेळाव्याचे आयोजन. ‌‌(महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती) भद्रावती दि.12 :-भद्रावती  येथील तिरके कुणबी समाज मंडळा तर्फे दि.१६ फेब्रुवारी २०२५ रोज रविवारला श्रीमंगल कार्यालय भद्रावती  येथे विदर्भस्तरीय भव्य वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे उदघाटन अशोक घारफळकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ त्यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र वैध स्वागताध्यक्ष रविंद्र शिंदे संस्थापक रविंद्र शिंदे चंँरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर व प्रमुख वक्ते / मार्गदर्शक प्रबोधनकार प्रविण देशमुख यवतमाळ त्यांचे प्रमुख उपस्थितीत सदर सोहळा संपन्न होत आहे सामाजिक बांधिलकी व वचनवध्दता ह्या उद्यात हेतूने सदर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून जास्तीत जास्त समाज बांधवानी उपवर मुल / मुलींसह सदर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक प्रमूख वंसता मानकर, मोहन पवार(अध्यक्ष) अमोल दौलत कर(सचिव) वसंता मानकर,(उपाध्यक्ष /समिती प्रमुख) कृष्णा इंगळे (कार्यप्रमुख) प्रशांत इंगळे,(सचिव प्रसिदीप्रमुख) अमोल गांवंडे (कोषाध्यक्ष) छत्रपती राऊत,शंकर मिरे,प्रविण ठाकरे,विजय भोयर,दत्ता कोवे,रवि देऊरकर,प्रशांत पुरानकर,प्रणय पवार, सदर समाज मेळाव्यात स्मरणिकेचे विमोचन करण्यात येत असून परिचय नोंदणी करीता ९४२०४४४१०५,८८८८६७६७४३,७३५०५४१६१८,९३०९३३४३६५,ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन समाजबांधवांनी कलेले आहे.

तिरळे कुणबी समाज भद्रावती  तर्फे विदर्भस्तरीय वधु - वर परिचय मेळाव्याचे आयोजन.                                 ‌‌
Previous Post Next Post