भुसावळ - फैजपूर राज्य मार्गालगत काटेरी झुडपाचा विळखा .अपघाताची दाट शक्यता... (यावल ग्रामीण प्रतिनिधी पाडळसे सुरेश खैरनार) पाडळसे ता यावल भुसावळ फैजपूर राज्य मार्गावरील पाडळसे ते बामणोद व पाडळसे ते अकलुद दरम्यान राज्यमार्गवरील साईडपटी वर काटेरी झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे रस्त्यावरुन पादचारी आणि शेतकऱ्यांचे बैलगाडी गावातील गुरेढोरे यांना रस्त्यांच्या मध्यभागातून जावेलागत आहे यांमुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे तसेच पाडळसे गावापासून एक किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र असून पाडळसे गावातील वृध्द नागरीक, महिला बालके हे पायीच उपचार घेण्यासाठी दररोज येजा करतात तसेच गावातील नागरीक मॉर्निंग वॉक साठी दररोज मार्गाचा वापर करतात तरी वरील बाबींचा विचार करून संबंधित विभागाने आणि लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष देऊन भुसावळ - फैजपूर राज्यमार्गवरील पाडळसे ते बामणोद पाडळसे ते अकलूद मार्गालगतची काटेरी झाडे व झुडपांची साफसफाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0

