कुंभाराखेडा येथील बँकेचे कुलूप तोडले .. (सावदा ता. रावेर प्रतिनिधी ) कुंभारखेडा येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे कुलूप तोडण्याची घटना 12 रोजी रात्री घडली या दरम्यान शेजारी असलेल्या घरमालकाला जाग आल्याने चोरीचा प्रयत्न फसला आहे हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेला आहे कुंभारखेडा येथील जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेचे कामकाजआटपवून अधिकारी व कर्मचारी घरी गेले होते त्याच दिवशी रात्री सुमारे बँकेचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरांनी केला परंतु शेजारी असलेल्या प्रदीप पाटील व त्यांच्या भावाला जाग आली त्यांनी घरातील लाईट लावतात यावेळी चोरट्यांनी पळ काढला घर मालकाला शंका येताच त्याने बँक व्यवस्थापनाला झालेली घटना कळवली आहे रात्री पोलिसांनी पाहणी केली व व्यवस्थापनाने नवीन कुलूप लावले पुढील तपास एपीआय विशाल पाटील व सहकारी करीत आहेत पोलीससानी पेट्रोलियम वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0

