किड्झेनिया मुंबईतर्फे नवी मुंबई महानगपालिकेच्या शाळांमधील 13,000 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि अनुभवात्मक आनंदाच्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन. मुंबई : किड्झेनिया मुंबई या ग्लोबल इनडोअर एज्युटेनमेंट थीम पार्कने नवी मुंबई महानगरपालिका शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी एक वैशिष्ट्यपूर्ण व इंटरॅक्टिव्ह शिक्षण अनुभव प्रदान करणाऱ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. 20 ते 29 जानेवारी या 10 दिवसांच्या कालावधीत दुसरी ते पाचवीच्या एकूण 13,705 विद्यार्थ्यांनी किड्झेनियाला भेट दिली. किड्झेनिया मुंबईसाठी हा एक सर्वात मोठा शालेय उपक्रम ठरला. या उपक्रमाचे नेतृत्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी केले. मुलांना घडविण्यासाठी अनुभवात्मक शिक्षणाच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. किड्झेनियाच्या इंटरॅक्टिव्ह रोल-प्लेइंग अॅक्टिव्हिटींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जगातील प्रोफेशन्स, आर्थिक साक्षरता, टीम-वर्क, समस्या सोडविण्याची कौशल्यांची ओळख करून देणे, हा या भेटीचा उद्देश होता.या भेटीदरम्यान, विद्यार्थ्यांनी विविध करिअवर आधारित अॅक्टिव्हिटी करून पाहिल्या. त्यांना या ठिकाणी डॉक्टर, अग्निशमन कर्मचारी, वैमानिक, पत्रकार, शेफ आणि अशा अनेक भूमिका जगण्याची संधी प्राप्त झाली. या रंजक अनुभवांच्या माध्यमातून विविध करिअर पर्याय समजून घेण्याचा गंमतदार शैक्षणिक दृष्टिकोन उपलब्ध झाला, कल्पकतेला चालना मिळाली आणि उत्सुकतेला प्रोत्साहन मिळाले.या उपक्रमाबद्दल उत्साह व्यक्त करताना किड्झेनिया इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर (सीबीओ) तरणदीप सिंग सेखों म्हणाले, "किड्झेनिया मुंबईमध्ये नवी मुंबई महानगपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद झाला. रंजक आणि खिळवून ठेवणाऱ्या अनुभवाच्या माध्यमातून जीवनावश्यक कौशल्ये साध्य करण्यास मदत करणारे अनुभवात्मक अध्ययन वातावरण उपलब्ध करून देणे हे किड्झेनियामध्ये आमचे मिशन आहे. नवी मुंबई महानगरपालिकेसोबत केलेल्या या सहयोगातून, सगळ्या मुलांसाठी शिक्षण सुलभ आणि आनंददायक असावे यासाठीची आमची प्रतिबद्धता दिसून येते. या लहानग्यांचा उत्साह आणि जिज्ञासा पाहणे खरोखर आनंददायक होते. अशा आणखी उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत."या वेळी श्रीमती संघरत्ना खिल्लारे यांनी शिक्षणातील प्रत्यक्ष अनुभवांचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, "नवी मुंबई महानगरपालिकेत आम्ही विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. किड्झेनियाच्या अनोख्या एज्युटेनमेंट प्लॅटफॉर्ममुळे मुलांना खेळाच्या माध्यमातून शिकता येते. यामुळे त्यांच्यात आवश्यक जीवनकौशल्ये विकसित होतात आणि ते सुरक्षित व मनोरंजक वातावरणात शिकण्याचा आनंद घेतात.”किड्झेनिया मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिका यांची ही भागीदारी अनुभवाधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करते. यामुळे नवीन पिढीला आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होते. या व्यापक उपक्रमाच्या माध्यमातून किड्झेनिया मुंबई मुलांसाठी एक लोकप्रिय शिकण्याचे ठिकाण ठरले आहे, जिथे त्यांना हसत-खेळत नवनवीन गोष्टी शोधण्याची, शिकण्याची आणि वाढण्याची संधी मिळते.

किड्झेनिया मुंबईतर्फे नवी मुंबई महानगपालिकेच्या शाळांमधील 13,000 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि अनुभवात्मक आनंदाच्या अनोख्या उपक्रमाचे आयोजन.                                                                               
Previous Post Next Post