वडार समाज बहुउद्देशीय संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान अध्यक्षपदी कैलास कुऱ्हाडे यांची तर सचिव पदी रवींद्र कुऱ्हाडे यांची निवड .... (पाडळसे ता .यावल वार्ताहर) यावल तालुक्यातील पाडळसे येथे सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने वडार समाज बहुउद्देशीय संस्था पाडळसे तालुका यावल जिल्हा जळगाव या नावाने संस्था स्थापन करण्यात आली असून संस्थेला म.सहा.धर्मदाय आयुक्त सो.जळगाव यांचेकडून जळगाव /६८/२०२५ या क्रमांकाने नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलेले आहे संस्थेच्या माध्यमातून भविष्यात शैक्षणिक सामाजिक व इतर उद्देशीय सामाजिक कामे साध्य करण्याचा माणस आहे. संस्थेची कार्यकारणी पुढील प्रमाणे आहे अध्यक्ष कैलास त्र्यंबक कुऱ्हाडेउपाध्यक्ष गोपाल त्र्यंबक कुऱ्हाडेखजिनदार शिवलाल त्र्यंबक कुऱ्हाडेसचिव रविंद्र कैलास कुऱ्हाडे सहसचिव त्र्यंबक गंगाराम कुऱ्हाडेसभासद राहुल त्र्यंबक कुऱ्हाडेसभासद संतोष बारकु कुऱ्हाडेअशी कार्यकारणीची निवड करण्यात आली या निवडीबद्दल केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल दादा जावळे पाडळसे सरपंच गुणवंतीताई पाटील यांनी पुढील कार्यासाठी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

वडार समाज बहुउद्देशीय संस्थेला नोंदणी प्रमाणपत्र प्रदान अध्यक्षपदी कैलास कुऱ्हाडे यांची तर सचिव पदी रवींद्र कुऱ्हाडे यांची निवड ....                                         
Previous Post Next Post