**परिक्षा परिसरात शांतता, आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता -2023 चे कलम 163 लागू**@)>जिल्हादंडाधिकारी , श्री, रघूनाथ गावडे.*. (प्रतिनिधी / अनिल चव्हाण.). ————————————— महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयता 12 वी) दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयता 10 वी) दिनांक 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक, प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात कोणत्याही व्यक्तीस प्रवेश निर्बंध करण्यात आले आहे...

**परिक्षा परिसरात शांतता, आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता -2023 चे कलम 163 लागू**@)>जिल्हादंडाधिकारी , श्री, रघूनाथ गावडे.*.                                                            
Previous Post Next Post