*शिष्यवृत्ती महासराव परीक्षेत सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयाचा विराज शिसोदियाचे घवघवीत यश*. (मानवत / प्रतिनिधी).परभणी येथे जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी आयोजित शिष्यवृत्ती महासराव परीक्षेमध्ये सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालय, मानवत येथील विराज अमरसिंग शिसोदिया याने सर्व विद्यार्थ्यांतून प्रथम क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शैक्षणिक गौरवात भर घातली आहे.विराजच्या या यशामागे त्याची मेहनत, जिद्द तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री. श्रीपाद दडके यांचे परिश्रम मोलाचे ठरले. या स्पर्धेत राज्यभरातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, मात्र उत्कृष्ट तयारी व हुशारीच्या जोरावर विराजने पहिल्या क्रमांकावर आपले नाव कोरले.संस्थेचे अध्यक्ष मा.श्री विजयकुमार कत्रुवार,संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी ,मार्गदर्शक तथा प्रशासक मा.श्री प्रवीण बेले, मुख्याध्यापक मा.श्री विश्वभूषण इंगोले पर्यवेक्षक विलास शिंदे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विराज सिसोदिया कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या*

शिष्यवृत्ती महासराव परीक्षेत सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा विद्यालयाचा विराज शिसोदियाचे घवघवीत यश*.      
Previous Post Next Post