**१५ फेब्रूवारी पासून सक्तिने कर वसुली संदर्भात मुख्याधिकारी यांचा आक्रमक पवित्रा मानवत नगर परिषद प्रशासन हायअर्लट.* (मानवत / प्रतिनिधी.)अवैध्य अतिक्रमणधारक यांच्या सह बेकायदा पोटभाडे करू यांचा मुद्दा ऐरणीवर असून शहरातील वाढते अतीक्रमण व जागा दिसेल तेथे कब्जा करून नगर परिषदेचा कर बूडवणार्‍यावर नगर परिषदेची वक्रदृष्टी मूख्याधिकारी यांची कडक व बेधडक वसूली मोहिम लवकरच प्रारंभ होणार असून नगर पालिका वसूली प्रशासन हायअर्लट झाले आहे. तर अर्थिक वर्ष 2024-25 संपत आलेले असून वसुलीसाठी वरिष्ठ कार्यलयाकडून वारंवार कर वसुली संदर्भात बैठका घेण्यात येत आहेत. त्यामध्ये शासनाने दिलेले कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास शासन अनुदान बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आज दि.05 फेब्रुवारी रोजी नगर परिषदेची कर वसुली संदर्भात मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. दुकान भाडे, घरपट्टी, नळपट्टी इत्यादी विषयावर आढावा घेण्यात आला. 28 जानेवारी रोजी ज्या पद्धतीने कोमल सावरे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन गाळे भाडे थकबाकीदार यांच्या दुकानात सील ठोकले होते. त्याचप्रमाणे शहरातील वसुली रक्कम दहा हजार रुपये च्या वरती कर थकबाकीदारांवर कुठलीही गय करण्यात येणार नाही असे निर्देश सर्व बिल कलेक्टर यांना मुख्याधिकारी यांच्याकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे. शहरातील सर्व थकबाकीदारांना यापूर्वी सूचना देवून 15 फेब्रुवारी पर्यंत थकबाकी भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. तरीसुद्धा थकबाकीदार आपला कर भरणा करण्यास उदासीन दिसून येत आहेत, त्यामुळे नाईलाजास्तव ज्या थकबाकीदाराकडे दहा हजार रुपये पेक्षा जास्त थकबाकी आहे अशा सर्व थकबाकीदारांची यादी निश्चित करण्यासाठी आजची बैठक घेण्यात आली. दि. 15 फेब्रुवारी रोजी शहरातील मुख्य ठिकाणी म्हणजेच बस स्टॅन्ड, मुख्य मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगरपरिषद कार्यालय इत्यादी ठिकाणी ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी आपल्याकडे असलेले थकबाकी लवकरात लवकर नगरपरिषद कार्यालयात भरून नगर परिषदेत सहकार्य करावे अन्यथा कार्यवाहीस सामोरे जावे लागेल. 15 फेब्रुवारी नंतर थकबाकीदार यांच्या दारात ढोल ताशा लावून वसुली करण्यात येईल. तसेच थकबाकीदार यांच्या पी.टी.आर. वरती शास्तीसह बोजा लावण्यात येईल. असे निर्देश कोमल सावरे मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद मानवत यांनी दिले आहेत. नगर परिषदेमार्फत वसुलीसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली असून यामध्ये एकूण पाच पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. सदरील बैठकीस नगर परिषदेत सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कडक आदेश असल्यामूळे वसूली अधिकारी हायअर्लट झाले आहे...

*१५ फेब्रूवारी पासून सक्तिने कर वसुली संदर्भात मुख्याधिकारी यांचा आक्रमक पवित्रा मानवत नगर परिषद प्रशासन हायअर्लट.*                                              
Previous Post Next Post