तिरळे कुणबी समाजाचा विदर्भ स्तरीय मेळावा व भव्य वधु - वर परिचय मेळावा संपन्न.१८० मूला मुलीने परिचय दिला. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती) भद्रावती दि.22:- तिरळे कुणबी समाज भद्रावतीच्या वतीने येथील श्री मंगल कार्यालय मेन रोडभद्रावती येथे दि.१६ /२/२०२५ रोजी संपन्न झाला या भव्य वधुवर परिचय मेळाव्याचे उदघाटन अशोक घार फळकर.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यवतमाळ यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष पद राजेंद्र वैद्य चंद्रपूर यांनी केले.कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून रवींद्र शिंदे भद्रावती हे होते,कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व प्रबोधनकार प्रविण देशमुख यवतमाळ हे होते कार्यक्रमाचे अतिथी म्हणून सुरेश गुळधे पाटिल नागपूर,नरेंद्र पाटिल ठाकरे वरोरा,प्राध्यापक सुरेखा देशमुख हिंगणघाट,तहसिलदार पल्लवी प्रदीप आखरे चंद्रपूर हे मान्यवर गण लाभले,कार्यक्रमाचे उदघाटक व दिप प्र ज्वलन अशोक घारफळकर यांनी समस्त समाजबांधवांच्या उपस्थितीत व ताडाच्या गडगडात केले या कार्यक्रमासाठी वसंतराव मानकर आयोजक समिती प्रमुख छत्रपती राऊत, मोहन पवार,अमोल दौलतकर (सचिव), कृष्णा इंगळे,प्रशांत इंगळे,अमोल गावंडे,रवी देऊलकर,शंकर मिरे,प्रणय पवार,विजय भोयर,ओंकार मोंघे,पांडुरंग इंगळे,प्रशांत तुरांणकर,चेतन कोंबे,प्रविण निकम,उज्वला वानखेडे,विद्या मोघे,सोनाली गावंडे,सुवर्णा दौलतकर,यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यांत मोलाचा हातभार लावला अँड जयता ठाकरे,विनोद राऊत,बालु भोयर,कार्यक्रमाचे संचालन शंकर मिरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशांत तुरांणकर सर यांनी केले कार्यक्रमासाठी विदर्भातील हजारो समाज बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाला १८० मूला मुलीने परिचय दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन अमोल दौलतकर भद्रावती यांनी यशस्वीपणे केले.

तिरळे कुणबी समाजाचा विदर्भ स्तरीय मेळावा व भव्य वधु - वर परिचय मेळावा संपन्न.१८० मूला मुलीने परिचय दिला.                                                                        
Previous Post Next Post