**मानवत शहरात संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.**. (शोभायात्रेतील टाळ मृदंगाच्या गजरानी शहर दूमदूमले )*. मानवत प्रतिनिधी // अनिल चव्हाण. @९५२७३०३५५९-——————————————————चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्सवात चर्मकार समाज बांधवानी मोठ्या आनंदोत्साहात साजरी करण्यात आली.राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मकार समाज बांधव यांच्या विद्यमाने आज मानवत शहरात संत शिरोमणी संत गूरू रविदास महाराज यांची जयंती राष्ट्रिय चर्मकार महासंघ व चर्मकार समाज बांधवांच्या वतीने संत शिरोमणी संत गूरू रविदास महाराज यांची जयंती मानवत शहरात राष्ट्रिय चर्मकार महासंघ व चर्मकार समाज बांधव यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील नवे दत्त मंदिर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत चर्मकार समाजाच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा शहरातून काढण्यात आली. यावेळी मानवत शहरातील व परिसरातील सर्व चर्मकार बांधव महिला पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभायात्रेमध्ये बाल वारकर्‍यांनी सहभाग घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात भव्य शोभा यात्रेची शोभा वाढवली.**

**मानवत शहरात संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.**.                  (शोभायात्रेतील टाळ मृदंगाच्या गजरानी शहर दूमदूमले )*.                                                          
Previous Post Next Post