माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धूपे यांना निलंबित करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ! देश उभारणीत शिक्षण व शिक्षकाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी मुबलक, कुशल, सुसंस्कारित मनुष्यबळ तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते शिक्षक तणाव मुक्त असावा म्हणून त्यांना अर्थीक स्थैर्य आणि सामाजिक प्रतिष्ठा देण्यात आली आहे.शिक्षकांच्या अडीच अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात आली असून जिल्हा पातळीवरील समस्या सोडविण्यात शिक्षण अधिकारी महोदयांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष कराचा मंत्र घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला.त्याप्रमाणे समाजातील एक जागरूक आणि महत्त्वाचा घटक म्हणून शिक्षक संघटित झाला व आपले कर्तव्य बजावत असताना हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी संघटना स्थापन केल्या,मराठवाडा शिक्षक संघ ही त्यापैकीच एक!या संघटनेस 58 वर्षाचा इतिहास असून शिक्षकांना सेवा शाश्वतीपासून सेवानिवृत्ती पर्यंतचे लाभ मिळवून देण्यात संघटनेने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.आज हि आपले शैक्षणिक कार्य पूर्ण करून अन्याय ग्रस्त शिक्षकांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका मराठवाडा शिक्षक संघाचे पदाधिकारी घेतात.जालना जिल्ह्यात शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत,दोन महिन्यापासून आठ ते दहा शाळांचे वेतन प्रलंबित आहे, आर्थिक नियोजन कोलमडल्याने त्या शाळावर कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परेशान आहेत,मासीक नियमीत वेतनात ही कमालीची अनियमितता आहे.नियमबाह्य वैयक्तिक मान्यतेवरील आक्षेप व इतर प्रलंबित प्रकरणाबाबत पदाधिकारी रीतसर निवेदन घेऊन गेले असताना शिक्षनाधिकारी(माध्यमिक) पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न/समस्या सोडवण्याऐवजी संघटना पदाधिकाऱ्यांना अपमानित करतात,अरेरावी, गैरवर्तन करतात,आता तर त्यांची मजल संघटना पदाधिकाऱ्यांवर पोलिसांकडे खोटी तक्रार करण्यापर्यंत गेली आहे.कार्यालयीन वेळेत शिक्षणाधिकारी माध्यमिक व त्यांचे कर्मचारी क्वचितच कार्यालयात असतात,मात्र सायंकाळी सहा नंतर कार्यालय सुरू होते.आर्थिक सौदेबाजी करणाऱ्यांची कामे कार्यालयीन वेळानंतर मार्गी लागतात. त्यानुसारच नियमानुसार कामे करण्याचा आग्रह धरणाऱ्या मराठवाडा शिक्षक संघ पदाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना अडचण होत असून संघटना पदाधिकाऱ्यांना अपमानित करून उलट त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. शिक्षकांची आडवणूक करणाऱ्या शिक्षणाधिकारी माध्यमिक जालना यांच्या बद्दल शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष नाराजी निर्माण झालेली आहे.त्यांची दखल घेऊन शिक्षकाचे आर्थिक मानसिक शोषण करून प्रश्न प्रलंबित ठेवणारे मग्रूर शिक्षणाधिकारी माध्यमिक जालना यांना हटवणे, योग्य ती कार्यवाही करणे व त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची आम्ही आग्रही मागणी करत आहोत. त्वरित कार्यवाही करून अप्रिय घटना टाळाव्यात ही विनंती. संघटनेच्या मागण्या खालील पद्धतीने आहेत.1)श्रीमती मंगल धुपे गायकवाड शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांना पदावरून हटवावे. 2)शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांच्या संपत्ती संपत्तीची चौकशी करावी.3)शिक्षकांशी मगरुरपणे वर्तन करून अपमानित करणारे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी.4) जालना जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातील वेतनातील अनियमित्ता दूर करावी.5) जगन वाघमोडे यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्यावा.6) नियमबाह्य वैयक्तिक मान्यतांची चौकशी करण्यात यावी.7)दिर्घ काळापासून प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावी.8)2020- 21 पासून प्रलंबित भविष्य निर्वाह निधी पावत्या देण्यात याव्यात.9) फेब्रुवारी 2025 देयकासोबत सातवा वेतन आयोगाचा पाचवा हप्ता (राहिलेले 1,2,3 व 4था) त्या सह ऑनलाइन पद्धतीने करणे बाबतच्या 7 फेब्रुवारी 2025 च्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.10) दिनांक 27/ 02 /2025 रोजी चे माननीय शिक्षणाधिकारी कार्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे.11) कार्यालयात संध्याकाळी सहा वाजे नंतर भरपूर गर्दी असणे व संचयिका निकाली काढल्या जातात.12)पुर्ण वेळ वेतन अधीक्षक देण्यात यावा. निवेदनावर प्रा डॉ मारोती तेगमपुरे,ज्ञानोबा वरवटे, प्रेमदास राठोड, आरेफ कुरेशी, रमेश आंधळे, संजय येळवंते,नारायण मुंडे, फरखुंद अली सय्यद,भीमाशंकर शिंदे, जगन वाघमोडे, तुकाराम पडघन,प्रदुम्ण काकड, भगवान धनगे,हकीम पटेल इत्यादीच्या सह्या होत्या.
byMEDIA POLICE TIME
-
0