स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता असते तिचा सन्मान केवळ महिला दिना पुरता न करतात आयुष्यभर करा. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : दि.15 मार्च. स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंत काळाची माता आहे तिचा सन्मान केवळ महिला दिना पुरता न करता ती आयुष्यभर सन्मानास पात्र आहे असे प्रतिपादन प्रा संगीता अवचार यांनी केले. सेलू येथील छत्रपती शिवाजी नगरात आस्था सेवाभावी संस्था,डॉ अशोकराव जोगदंड चारिटेबलट्रस्ट,अधिराज मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सेलू तथा सुनिल गायकवाड मित्र मंडळ आयोजित महिला दिना निमित्त आयोजित सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सेवानिवृत्त शिक्षिका मंगल जोगदंड,उदघाटक पाथरी येथील ऊसतोड कामगार नंदा हिवाळे,सेलू येथील पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी, मंडळ अधिकारी सारिका हेडगे, अभियंता श्रद्धा घोडके,स्त्री रोग तज्ज्ञ सुवर्णा नाईकनवरे,सरकारी अभियोगता रुपाली आमले,नूतन कन्या प्रशाळेच्या मुख्याद्यापिका निशा पाटील आदिची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी महिलांची बदलत्या समाज भानातील भूमिका यावर प्रा संगीता अवचार यांनी प्रकाश टाकला त्या म्हणाल्या की आपली संस्कृती ही आपल्या मुलांना समजून सांगितली पाहिजे. मुले ही मोबाईलपासून परावृत्त झाली पाहिजेत आपली मातृभाषा मुलांना अवगत होण्यासाठी आपण स्त्री आई म्हणून प्रयत्न करणे नितांत गरजेचे आहे. असे त्या म्हणाल्या.आपला माणूस सुनिल गायकवाड यांचे त्यांनी कौतुक केले व म्हणाल्या की या धकाधकीच्या जीवनात कुणाकडेही दुसऱ्या साठी वेळ नाही पण सुनिल गायकवाड यांनी सतत मागील 5 वर्षापासून हा आदर्श उपक्रम राबवून स्त्री शक्तीचा सन्मान करून एक आदर्श पायंडा निर्माण केला आहे.प्रस्ताविकात सुनिल गायकवाड म्हणाले की मागील 5 वर्षापासून हा उपक्रम राबवत असून सर्व समाजातील स्तरातून मदतीचा हात घेऊन हे शिव धनुष्य पेलतो आहे आज माझ्या आईची आठवण येत असून फेटे घातलेल्या कर्तृत्वान महिला यांच्या रूपात मला माझ्या आईचे दर्शन होत आहे याचा मनस्वी हर्ष होतो आहे.या वेळी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवणाऱ्या 51 महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुछ, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन सन्मान मान्यवरांच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्तविक संयोजक सुनिल गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले तर आभार शुकाचार्य शिंदे यांनी मानले कार्याल्लेख कीर्ती राऊत यांनी मांडला, पाहुण्यांचा परिचय शिल्पा बरडे यांनी दिला. यादीवाचन श्याम मचाले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी पि. के. शिंदे,प्रशांतसिंग ठाकूर,विष्णू बागल ,वसंत शेरे ,अभिजीत गायकवाड, भगवान यादव, अंबादास इगवे, गोविंद पडघन,भाऊसाहेब घाडगे ,मंगेश मगर, पु ना बाडकर मनीष बोरगावकर किशोर गजमल, मुकुंद डासाळकर, छाया पाचलेगावकर, कांचन हिवाळे ,मोहिनी गायकवाड, अश्विनी गायकवाड, दिनेश कटारे, सदाशिव महाजन आदिनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0