वाढदिवसाच्या निमित्ताने आदिवासी चिमुकल्यांना खाऊ वाटप. रावेर तालुक्यातील गौरखेडा येथील ग्रा.प सदस्य व दैनिक पुण्य प्रताप चे सावदा परिसर पत्रकार महेंद्र पाटील यांचा वाढदिवस आज दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी आदिवासी पाड्यावर जाऊन लहान चिमुकल्यांना खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खानदेश विभाग कार्याध्यक्ष संतोष नवले ,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) योगेश सैतवाल, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य गोपाळ पाटील, रमेश पाटील,कुणाल पाटील निलेश महाजन व आदिवासी पाड्यावरील शाळेतील शिक्षक वृंद... व लहान लहान चिमुकले उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0