विनोद बोराडे मित्र मंडळ आयोजित सुंदर माझे गुढी स्पर्धा संपन्न. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा व श्रीराम जन्माच्या पावन पर्वावर घेण्यात येणाऱ्या श्री साई महोत्सवा ची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते श्री साई महोत्सव 2025 च्या सुंदर माझी गुढी या स्पर्धेची सुरुवात दिनांक 30 मार्च 2025 रोजी झाली या स्पर्धेमध्ये सेलू शहरातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला. विविध प्रकारे सुंदर गुडी सजवून कला प्रदर्शन करण्यात आले. यावेळी विनोद बोराडे मित्र मंडळ तर्फे सहभागी झालेल्या व येणाऱ्या सर्व नागरिकांचे स्पर्धेबद्दल भरपूर कौतुक करून प्रशंसा करण्यात आली. स्पर्धेसाठी अतिशय सुंदर असे आयोजन करण्यात आले होते.
byMEDIA POLICE TIME
-
0