...अन त्या निराधाराला मिळाला कायमचा आसरा.. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.4- इथे सदोदित वाहतो माणुसकीचा झरा, युवाशक्ती सोशल फाउंडेशनची सामाजिक बांधिलकी या मथळ्याखाली काल प्रकाशित बातमीला यशस्वीता मिळाली असून सदर वृद्ध व्यक्तीला त्याच्या घरचा आधार मिळाला आहे.वृत्त असे की घुग्गुस साखरवाही रोड वर मुरसा जवळ काही दिवसांपासून एक गतिमंदसदृश्य 55-60 वर्ष्याची व्यक्ती रस्त्याच्या कडेला चंद्रपूर जिल्याच्या प्रखर आणि रखरखत्या उन्हात दिवस रात्र आपलं जीवन खितपत घालवत होता. याची भनक युवाशक्ती सोशल वेलफेयर फाउंडेशन चे अध्यक्ष शुभम मत्ते व उपाध्यक्ष आकाश घोरपडे यांना लागताच त्यांनी तुरंत आपली सूत्र चालवली व फाउंडेशन च्या सदस्यांच्या मदतीने त्या वृद्ध व्यक्तीला आंघोळ, कपडे, जेवण व वैद्यकीय सेवा देऊन आपले सामाजिक ऋण फेडले व या व्यक्तीला पुढील वैद्यकीय सेवेसाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे दाखल करून घेतले आहे. सदर वृद्ध व्यक्ती आपले नाव गाव व इतर कोणतीही माहिती देण्याच्या मानसिकतेत नसल्यामुळे फाउंडेशन नि त्याच्या घरच्याना आवाहन केले होते. समाजमाध्यमातून पसरलेला हा संदेश त्यांच्या घरापर्यंत पोहचला.ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथून सुट्टी करून भद्रावती पोलिसांच्या सहाय्याने पोलीस गाडी मध्ये सदर व्यक्ती ला रात्री 10 वाजता त्यांचा घरी सोडले. व्यक्ती चे नाव मारोती झाडे वय 53 सुभाष नगर घुग्गुस येथील राहवासी आहेत. मारोती झाडे हे त्यांचा लहान भावा कडे राहतात. मारोती झाडे यांची मानसिक हालत चांगली नसल्यामुळे 15 महिना पासून ते बेप्पता होते. श्री हेमंत झाडे हे सुद्धा भावाच्या शोधा मध्ये होते परंतू मारोती झाडे यांच्या झालेल्या अवस्थेमुळे त्यांची कोणाला पण ओळख पटू शकली नाही. भाऊ परत घरी आलेले बघून श्री हेमंत झाडे आणि त्यांचा परिवार भावुक झाले या केलेल्या कामगिरी मुळे भद्रावती पोलीस ठाणेदार पोलीस निरीक्षक श्रीमती लता वाढवे मॅडम यांनी समस्त युवाशक्ती टीम चे अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.या सामाजिक दायित्वात मोलाची भूमिका निभवली होती ती शुभम मत्ते, आकाश घोरपडे, वैभव शेरकी, शंकर कोहळे, हर्षल बोढाले, सोहम घोटकर, आदर्श घोटकर, विवेक बोरीकर, साहिल शेरकी, करण आत्राम, सचिन झाडे, तेजस उपासे, सुनील घोटकर यांनी. यांच्या या कार्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून यांचे कौतुक करण्यात येत आहे

अन त्या निराधाराला मिळाला कायमचा आसरा..          
Previous Post Next Post