निवासी नायब तहसीलदार स्टोन क्रशर चालकासोबत सहलीवर गेल्याची चर्चा गौण खनिज वाहतूकदारांमध्ये. (यावल दि.८ ( सुरेश पाटील )यावल तहसील कार्यालयात नायब तहसीलदार म्हणून संतोष पी. विनंते कार्यरत आहेत.त्यांचा यावल तहसील कार्यालयात सेवा कालावधी ३ वर्ष पूर्ण झाला असल्याने तालुक्यात त्यांचे अनेकांशी सलोख्याचे,समन्वयाचे हितसंबंध चांगलेच वाढले आहे,तसेच त्यांनी एप्रिल २०२५ महिन्याच्या सुरुवातीला १० ते १५ दिवसाची सुटी टाकुन तालुक्यातील एका स्टोन क्रशर चालकासोबत सहलीवर गेल्याची जोरदार चर्चा गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार पदाची जबाबदारी फार महत्त्वाची असते, ३ वर्षांपूर्वी यावल तहसीलदार महेश पवार यांच्या कालावधीत तहसीलदार महेश पवार आणि आणि निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी संगनमताने अनेक महत्त्वाचे दिलेले आदेश आणि घेतलेले निर्णय हे आपल्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग करणारे आहेत याचे अनेक पुरावे माहिती अधिकारात मिळाले आहेत आणि ते पुरावे राखून आहेत, तत्कालीन तहसीलदार महेश पवार आणि निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या कालावधीत यावल तहसील कार्यालयाच्या आवारात जप्त करण्यात आलेले एक वाळूचे ट्रॅक्टर कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांने भाड्याने देऊन टाकले होते, याला कोण जबाबदार होते आणि आहेत..? त्या प्रकरणाची चौकशी होऊन कार्यवाही झालेली आहे.अवैध वाळू वाहतूक करतानाचे ट्रॅक्टर एका मंडळ अधिकाऱ्याने रीतसर पंचनामा करून जप्त केल्यावर तहसीलदार महेश पवार यांनी मोठ्या हुशारीने आणि चलाखीने त्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकास कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला होता.आणि ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर मध्ये वाळू नव्हती असा खुलासा देऊन दंडात्मक रक्कम न भरता ट्रॅक्टर सोडून नेले होते आणि आहे. असे अनेक प्रकारची प्रकरणे तत्कालीन तहसीलदार महेश पवार आणि निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या कालावधीत झालेले आहेत.निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी १० ते १५ दिवसाची अधिकृतरित्या सुट्टी टाकली असून ते सुटी टाकून खाजगी कामाने गेले की..? तालुक्यातील एका स्टोन क्रशर चालकासोबत..? सहलीवर गेले..? याबाबत आणि त्यामुळे गेल्या ३ ते ४ वर्षात गौण खनिज उत्खनन आणि अवैध गौण खनिज वाहतूक किती प्रमाणात झाली आणि किती प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली..? याबाबत अवैध गौण खनिज वाहतूकदारांसह महसूल क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0