*कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी- बिरसा फायटर्स* *कर्जमाफीतून शेतकरी साखरपुडे,विवाह करत फिरता-कृषीमंत्र्याचे वादग्रस्त विधान**शेतक-यांचे १००% कर्जमाफ करा-बिरसा फायटर्सची मागणी*. नंदूरबार प्रतिनिधी- शेतक-यांची कर्जमाफी करणेबाबत व कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडे, विवाह करत फिरता असे शेतकऱ्यांबद्धल वादग्रस्त विधान केल्याबद्दल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,धडगांव बिरसा फायटर्सचे सुरतान पावरा, बान्या पावरा, वागऱ्या पावरा कुशाल पावरा,बिरसा फायटर्स शहादाचे सुनिल मुसळदे, बापू पवार, चंद्रसिंग सोनवणे,अंबर सोनवणे,हिलाल पवार इत्यादी बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांसह भारत स्वाभीमानी संघाचे प्रदेश महासचिव रोहीदास वळवी,जिल्हाध्यक्ष पंकज वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, शेतमालाला हमीभाव नाही,अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा कर्जबाजारी आहे. कर्जबाजारीमुळे अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या पैशांतून साखरपुडे, विवाह करत फिरता,असे शेतकऱ्यांबद्धल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत व महाराष्ट्रातील जनतेत कृषीमंत्र्याबाबत तीव्र संताप निर्माण झालेला आहे.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.म्हणून शेतकऱ्यांबाबत असे बेताब वक्तव्य करणारे निंदनीय आहे.म्हणून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्रातील शेतक-यांची जाहीर माफी मागावी व शेतक-यांचे १०० टक्के कर्ज माफ करण्यात यावेत. जेणेकरून कर्जबाजारीच्या कारणास्तव शेतकरी आत्महत्या करणार नाहीत.अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0