सेलू उपजिल्हा रुग्णालयात महा डायलिसिस विभाग कार्यान्वित. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा: डॉ.गोळेगावकर यांचे आवाहन.सेलू : दि.03 सेलू येथील उप जिल्हा रुग्णालयात महालॅबतर्फे सोमवार 2 जून पासून महाडायलिसीस विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर यांच्या प्रयत्नातून 10 एप्रिल रोजी पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्याहस्ते या महाडायलिसीस विभागाचे उद्घाटन करण्यात आले होते. हा डायलेसिस विभाग आज 2 जून रोजी कार्यान्वित झाला आहे. हा महा डायलिसिस विभाग उपजिल्हा रुग्णालयांमध्ये बाह्यस्त्रोत यंत्रणेमार्फत म्हणजेच महालॅब मार्फत चालवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी डायलेसिस टेक्निशियन आकाश जाधव, स्टाफ नर्स शिवकन्या काळे या कार्यरत आहेत.या विभागामध्ये आज सीमा सहदेव काळे (वय 25 वर्ष राहणार डेंगळे पिंपळगाव) या रुग्णास डायलेसिस करण्यात आले. संबंधित रुग्णाला आठवड्यातून दोनदा सोमवार आणि गुरुवार रोजी डायलिसिस करण्यात येणार आहे. या रुग्णाला डायलिसिस करण्याकरता उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच टेक्निशियन आणि स्टाफ नर्स यांनी सहकार्य केले.दरम्यान, सेलू शहर व परिसरातील ज्या रुग्णांना डायलिसिसची आवश्य कता आहे अशा रुग्णांनी उप जिल्हा रुग्णालय सेलू येथील डायलेसिस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. जनार्दन गोळेगावकर यांनी केले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0