आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली सीडीसीसी बॅकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र शिंदे यांची निवास्थानी भेट घेतली. ( महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.:-आज दि.२५ ला चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. रवींद्र शिंदे यांची त्यांच्या भद्रावती येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे श्री. सुरेंद्र अडबाले, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. धनराज आस्वले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. वासुदेव ठाकरे तथा अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल श्री. रवींद्र शिंदे यांचे अभिनंदन केले तथा पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देत, सहकार क्षेत्रातील यशस्वी वाटचालीकरिता सदैव सोबत असल्याचे सांगितले. सोबतच अनेक विषयांवर चर्चा घडुन आली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0