पी. एम. श्री योजनेंतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात संपन्न. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.22 :- "कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव..." अशा प्रभावी घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला आणि पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देत गवराळा वॉर्ड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पी. एम. श्री योजनेंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमात मुख्याध्यापिका सौ. वनिता कोरडे, शिक्षिका शुभेच्छा साठे, तसेच शाळेतील इतर शिक्षक व शाळा सुधार समितीचे अध्यक्ष दीपक पोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. "माझी शाळा, सुंदर शाळा", "वृक्ष ही काळाची गरज" असे नारे देत ६ वी वर्गातील विद्यार्थीनी आरोही खडसे, स्वरा सोनटक्के, प्राची मिटपल्लीवार, सम्यक खैरे, दुर्वा गेडाम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. शाळा परिसर हिरवळीत न्हाल्याने रमणीय वातावरण तयार झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे, पालक प्रेम पलगंट्टीवार, शाहरुख पठाण, दिपाली झिंगरे आदी पालक व नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे पर्यावरणीय महत्त्व, प्रदूषण नियंत्रणातील भूमिका, आणि निरोगी जीवनासाठी वृक्षांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

पी. एम. श्री योजनेंतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात संपन्न.                                                                                         
Previous Post Next Post