*जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ तर्फे नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचा सत्कार.*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.24:-सहकार क्षेत्रातील दिग्गज नेतृत्व सामाजिक क्षेत्रात रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक गरजवंताना , अपंगाना, रुग्णांना मदतीचा हात पुढे करून सामाजिक कार्याला प्रथम प्राधान्य देणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे यांचा जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा वॉर्ड भद्रावती तर्फे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. आणि भविष्यात त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक लोककल्याणकारी कार्य होत राहो अश्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मंडळाचे संस्थापक सदस्य सामाजिक कार्यकर्ते लिमेश माणूसमारे, बंडू परचाके, पांडुरंग कोयचाडे सूर्यभान परचाके, बाबा निखाडे, प्रभाकर निमकर, उद्धव निळे, बबन जिवतोडे आदी जगन्नाथ भक्त उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0