*नालेसफाई, डासमुक्ती व रस्ता दुरुस्तीच्या मागणीसह आम आदमी पार्टी तर्फे नगर परिषदेला निवेदन". (*महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती, दि.१६ :- :- आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे शहरातील स्वच्छता व नागरी सुविधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या समस्या लक्षात घेऊन प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात शहरातील प्रत्येक वॉर्डातील नाले व गटारांची तातडीने स्वच्छता, नाल्यांवर डासमुक्तीची प्रभावी फवारणी, चेंबर्स नसलेल्या नाल्यांवर त्वरित चेंबर्स बसवणे, तसेच भाजी मंडी परिसरातील गुंडावार यांच्या दुकानासमोरील धोकादायक तुटलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. सध्या शहरातील अनेक भागांत नाले तुंबल्यामुळे दूषित पाणी रस्त्यावर साचत आहे, परिणामी नागरिकांना दुर्गंधी, रोगराई व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही कामे अत्यावश्यक ठरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले. सदर निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हा सहसचिव सोनाल पाटील, शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, विनीत निसरकर, राजकुमार चट्टे व अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

*नालेसफाई, डासमुक्ती व रस्ता दुरुस्तीच्या मागणीसह आम आदमी पार्टी तर्फे नगर परिषदेला निवेदन".                     
Previous Post Next Post