*मानवत येथे *माझा समाज,* तर्फे गूणवंत विद्यार्थ्यांचा गूण गौरव करूण सत्कार. ( मानवत / वार्ताहर.)————————मानवत येथे *माझा समाज* तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार व अभिनंदन समारंभ संपन्न झाला. महाकवी चंदवरदाई वाचनालयात मदत कर्त्यांचा गौरव, नीट परीक्षेत यशस्वी रित्या विद्यार्थ्यांचे गूण गौरव करून अभिनंदन करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की,15 ऑगस्ट भारतीय 79 वा स्वातंत्र्य दिवस आणि “माझा समाज” या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून महाकवी चंदवरदाई सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका केंद्रास मदत करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार व यशस्वी विद्यार्थ्यांचा गूण गौरव व अभिनंदन समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला प्रसिध्द वैद्यकीय डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. पी.आर. पाटील यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमात समाजातील अनेक मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. अंकुशरावजी लाड (वाचनालयास साहित्य पुरवठा), पत्रकार राणा संजयसिंह नाईक, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी उद्धवरावजी कच्छवे, सेवा निवृत्त शिक्षक सुभाषराव नाईक यांचा सन्मान करण्यात आला .तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे शब्द सुमनाने अभिनंदन करण्यात आले.यावेळी समाजातील विद्यार्थ्यांनी NEET परीक्षेत यश संपादन करून MBBS प्रवेशासाठी पात्रता मिळवलीकु. अपेक्षा दिलीपराव सोरेकर, परभणी ( शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, कु. कल्याणी बालाजी डांगे, सलगरा (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जूहू. मुंबई), कु. गायत्री उद्धवराव नाईक, पाथ्री ( शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर), मिहीर दिलीपराव कच्छवे, दैठणा ( शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबरनाथ ठाणे मुंबई ) तसेच मानवत येथील प्रदीप प्रकाश दहे याची पुणे येथे MSCB मध्ये विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचेही अभिनंदन करण्यात आले.या वेळी डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. पी.आर. पाटील, रेणकोजी दादा दहे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा. बालाजी कच्छवे यांच्या मार्गदर्शनातून परभणीत विद्यार्थी सन्मान समारंभा बाबत दुरध्वणी वरुन संवाद साधला. यात दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबत NEET, CET, JEE परीक्षेत यशस्वी विद्यार्थी, शासकीय सेवेत निवड झालेले तसेच निवृत्त मान्यवरांचा सन्मान करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. विठ्ठल डांगे, रेनकोजी दहे, बालाजी दहे, मुख्याध्यापक संजय लाड, अशोक बायस, डॉ. ओंकार लाड, प्रदुम्न लाड, केशव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक गोपाळराव लाड यांनी केले. तर प्रदुम्न लाड यांनी यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

मानवत येथे *माझा समाज,* तर्फे गूणवंत विद्यार्थ्यांचा गूण गौरव करूण सत्कार.                                                        
Previous Post Next Post