**स्वातंत्र्य दिना निमित्त मानवतकरांच्या सेवेत सफाई विभागात दोन मिनी घंटा गाड्या तर पाणिपूरवठा एक पाणी टँकर दाखल**@)> डॉ. अंकुशराव लाड यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न*. (मानवत / प्रतिनिधी.)———————मानवत शहरातील नागरिकांना स्वच्छता व पाणीपुरवठा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी दोन हायड्रोलिक मिनी ट्रॉली घंटा गाड्या आणि ३ हजार लिटर क्षमतेचा पाणी टँकर यांचे लोकार्पण स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून युवा नेते डॉ. अंकुशराव लाड यांच्या हस्ते करण्यात आले.मानवत शहरात ज्या ठिकाणी मोठ्या घंटा गाड्या पोहोचू शकत नाहीत अशा ठिकानी तिथे कचरा संकलनासाठी या मिनी हायड्रोलिक गाड्यांची मोठी मदत ठरणार आहेत. तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या पाणी टँकर मुळे विविध कार्यक्रमांसाठी, तातडीच्या सेवांसाठी आणि नागरिकांच्या गरजांसाठी प्रभावी पाणीपुरवठा करता येणार आहे. यामुळे शहरातील स्वच्छता मोहिमेसह पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.या लोकार्पण प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे, नगर अभियंता सय्यद अन्वर, पाणीपुरवठा अभियंता माधव बळवंते, लेखापाल महेश कदम, नगरसेवक दत्तराव चौधरी, मुंजाजी गवारे, स्वप्नील शिंदे, राहुल भदर्गे, देशमुख नाना यांच्यासह अनेक मान्यवर, नागरिक व पदाधिकारी या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते.**

स्वातंत्र्य दिना निमित्त मानवतकरांच्या सेवेत सफाई विभागात दोन मिनी घंटा गाड्या तर पाणिपूरवठा एक पाणी टँकर दाखल**@)> डॉ. अंकुशराव लाड यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न*.                                                           
Previous Post Next Post