.*पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश वाटप*. ( मानवत / वार्ताहर )दि. 15/8/25 रोजी के. के. एम. महाविद्यालय मानवत येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त गरजू विध्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा प्रसिध्द उद्योगपती श्री,विजयकुमारजी कत्रुवार, सचिव श्री. बालकिशन (भाऊ ) चांडक, सदस्य डॉ आनंद कत्रुवार, श्री. जयकुमारजी काला, ऍड. दिगंबर बारटक्के, संजयजी लड्डा, श्री. संजयकूमार बांगड, श्री. सुनीलसेठ काला, के.के.एम. महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी एकूण 47 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. शारदा राऊत यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. विनायक जाधव यांनी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.***
byMEDIA POLICE TIME
-
0